आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चंद्रपूर : क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपाच्या एका नेत्याची मेव्हणाही होता. त्याची मी उद्या पोलखोल करणार आहेच, असं सांगतानाच भाजपा नेत्याच्या मेव्हण्याला एनसीबीने का सोडले? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. याला आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आरोपी कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असला तरी कठोर कारवाई झाली पाहिजे. ड्रग्स प्रकरणात संशयाचे धुकं तयार करून त्यातून आर्यन खानला सोडवता येईल का? यासाठी प्रयत्न केला जात आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार प्रयत्न करत आहे का? या प्रकरणी देशाची युवा पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींना राजकीय संरक्षण नको, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
वसुली आली की या सरकारचा `ससा` होतो आणि शेतकर्यांच्या मदतीवेळी ‘कासव’; फडणवीसांची टीका
शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट
‘तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर धाडीही पडल्या नसत्या’; रावसाहेब दानवेंचा टोला