“राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवेंद्रराजेंना टक्कर देण्यासाठी भाजपचा ‘हा’ नेता हाती बांधणार घड्याळ”

0
528

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता सातारामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना आवाहन देण्यासाठी राष्ट्रवादीनं भाजप नेत्याला गळाला लावलं आहे. भाजपचे युवा नेते अमित कदम हे येत्या रविवारी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार आहेत. त्यामुळं साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा : भाजप आणि शिंदे गटात नाट्यनाराजी; ‘या’ भाजप खासदाराने जाहीरपणे व्यक्त केली खंत

दरम्यान, 2019 पर्यंत सातारा-जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजे असल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद होती. मात्र 2019 मध्ये शिवेंद्रराजेंंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीची सातारा-जावळी मतदारसंघातील ताकद कमी झाली. आता हीच ताकद भरून काढण्यासाठी , तसेच शिवेंद्रराजेंना निवडणूकीत आवाहन देण्यासाठी राष्ट्रवादीनं मोठी खेळी खेळली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

महाराष्ट्रातलं गृहखातं कुणाच्या दबावाखाली? आदित्य ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ठाण्यात जोरदार राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here