राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; भाजपच्या ‘या’ आमदारांनी NCP ला डिवचलं

0
483

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यात आज भाजप खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेर काँग्रेसनं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी म्हणून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या या आंदोलनानंतर गिरीश बापट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : “शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ 5 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

गिरीश बापट यांनी ते काँग्रेस कार्यकर्ते नव्हते तर माझेच कार्यकर्ते होते, असं सांगतानाच , राष्ट्रवादी काँग्रेसलाही डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष आहे. राष्ट्रवादीत दोन चार लोकचं निर्णय घेतात. तो पक्ष परिवारवादी पक्ष आहे, अशा गिरीश बापट यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जगताप यांनी म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना देखील 16 मार्चला भेटू असं गिरीश बापट म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“जळगावमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

किरीट सोमय्या वेडा माणूस, स्वत: तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे ; संजय राऊतांची टोलेबाजी

“राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर शरद पवारांनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here