“नाशिक हादरलं! ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार, सराईत गुन्हेगाराकडून चाकूच्या धाकाने अत्याचार”

0
328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढत चालले आहे.  नाशिकमध्येही अशीच एक संतापजनक घटना घडली आहे.

ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. त्यानंतर महिलेने मोठ्या धाडसाने अंबड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचंही समोर आलं आहे.

नाशिकमध्ये पवननगर भागात ही घटना घडली आहे. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून या महिलेवर अत्याचार केले. या भागात पीडित महिलेचं ब्यूटी पार्लर आहे. आपल्या पार्लरमध्ये ती महिला पूजा करत असताना संशयित आरोपी दुकानात घुसला. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप-मनसेमध्ये ‘फॉर्म्युला ठरला; पालघर जि.प पोटनिवडणुकांसाठी आखली ‘ही’ रणनीती

“काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

“मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेस जिवंत, अन्यथा हे मेले असते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here