नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात ; शिवसेनेची टीका

0
216

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. याला शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

नारायण राणे हे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात. राणे यांना फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही. बाळासाहेबांच्या विचारांना छेद देऊन राणे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं; शिंदे गटात सामील झालेल्या ‘या’ खासदारांचं वक्तव्य

पक्ष हा शिवसेना प्रमुखांचा असताना तो स्वत:चा करण्याचा प्रयत्न त्यावेळी राणेंनी केलाच होता. पण शिवसैनिकांनी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तो प्रयत्न हाणून पाडला. म्हणून आजही या धक्क्यातून नारायण राणे बाहेर निघू शकलेले नाहीत, असंही अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे आहेत, अशी  टीका नारायण राणेंनी केली होती.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरे आजही शिवसेनापक्षप्रमुख, यापुढेही कायम राहतील; शिंदे गटातील ‘या’ खासदाराचं विधान

“आठवलेंनंतर आता शिवसेनेला आंबेडकर चळवळीचा दुसरा नेता मिळणार; ‘हा’ मोठा नेता उद्या करणार शिवसेनेत प्रवेश”

‘या’ कारणासाठी महादेव जानकर करणार दिल्लीत आंदोलन; पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here