Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे आजही शिवसेनापक्षप्रमुख, यापुढेही कायम राहतील; शिंदे गटातील ‘या’ खासदाराचं विधान

उद्धव ठाकरे आजही शिवसेनापक्षप्रमुख, यापुढेही कायम राहतील; शिंदे गटातील ‘या’ खासदाराचं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेत्यांनी ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले खासदार हेमंत गोडसे यांनीही ठाकरेंना शुभेच्छा देत एक मोठं विधान केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास निरोगी व उदंड दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा !,असं शुभेच्छा हेमंत गोडसे यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या.

हे ही वाचा : “आठवलेंनंतर आता शिवसेनेला आंबेडकर चळवळीचा दुसरा नेता मिळणार; ‘हा’ मोठा नेता उद्या करणार शिवसेनेत प्रवेश”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून समाजाची मोठी सेवा घडो. केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाची सेवा त्यांच्या हातून होवे, या माझ्या भावना आहेत, असं गोडसे म्हणाले. तसेच पक्षात दोन गट पडले असले तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख पद अद्याप उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. यापुढेही त्यांच्याकडे राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे पद पक्षाचे मुख्य नेते असे जाहीर केले आहे. आमचा गटही शिवसेनेचे कुटुंब एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत आहोत., असंही गोडसे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘या’ कारणासाठी महादेव जानकर करणार दिल्लीत आंदोलन; पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती

शरद पवारांनी शिवसेना संपवली; बंडखोर आमदारांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

राज्यस्तरिय अबॅकस स्पर्धेमध्ये सांगलीने मारली बाजी