आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. नारायण राणेंच्या या टिकेनंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नारायण राणे हा थर्ड क्लास व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे.
नारायण राणे हा थर्ड क्लास व्यक्ती आहे, ज्या भाषेचा वापर करत त्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, ते पाहता ते शुद्धीत बोलत होते का दारू पिऊन आले होते, हे तपासावे, हे तपासण्याची गरज आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या…; मनसेचं उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र
नारायण राणे हे सतत उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबावर खालच्या पातळीवर भाष्य करतात. अशा थर्ड क्लास माणसाला आम्ही कवडीची किंमत देत नाही. उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणानंतर राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जे अकलेचे तारे तोडले आहेत, ते पाहिल्यानंतर पुन्हा एकदा हा माणूस किती थर्ड क्लास आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.
राणे आणि त्यांची मुलं शिवसेनेवर नेहमीच बोलत असतात. पण त्यांनी आपला पुर्व इतिहास बघायला हवा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राणे यांना ही ओळख मिळाली आहे. हे त्यांनी विसरू नये, असंही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राणे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेली भाषा, दिलेली धमकी याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार करणार आहे, अशी माहितीही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट
आदित्य ठाकरे तर तुरूंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही अन् तुम्ही…; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”