सिंधुदुर्ग : शिवसेनेनं हिंदुत्त्व विकून मुख्यमंत्रिपद घेतलंय. ठाकरे सरकार विकास करण्यासाठी अस्तित्वात आलं नसून काम बंद करण्यासाठी आलं आहे. काम बंद करुन ठेकेदाराला बोलवायचं आणि पैसे उकळायचे असंच सर्व सुरु आहे, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
सध्या 3 पक्षांचे सरकार आलं आहे. त्यांना मी स्थगिती सरकार नावं ठेवलं आहे. या सरकारने मागील 10 दिवसात केवळ मेट्रो आणि त्यासारख्या अन्य विकास कामांना स्थगिती देण्याचंच काम केलय . त्यामुळे सध्या विकास कामं बंद पडली आहेत, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे.
कोकणात अद्याप या सरकारचं अस्तित्वही कुठं दिसत नाही. कोकणातील विकासकामे ठप्प झाली आहेत. याला पूर्णपणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष जबाबदार आहेत, असंही राणेंनी म्हटलं आहे.
सध्या शिवसेनेचा एक खासदार कोकणात बैठका घेत आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यात शिवसेना नाही. असं असतानाही शिवसेनेचा खासदार सिंधुदुर्गमध्ये शासकीय बैठका कसा घेतो? अधिकाऱ्यांना सूचना कशा करतो?, हे जनतेसाठी, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी नाही, तर फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंसारख्या पनवतीमुळेच देवेंद्र फडणवीसांची गाडी रूळावरून घसरली- विनायक राऊत
शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार जडलाय, गेट वेल सून- अमृता फडणवीस
दिल्लीत अनाज मंडी येथे भीषण आग; 43 जणांचा मृत्यू
बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश- सुप्रिया सुळे