Home महाराष्ट्र ईडीच्या चौकशीला घाबरून नारायण राणेंचा भाजपमध्ये पळ; शिवसेनेचा हल्लाबोल

ईडीच्या चौकशीला घाबरून नारायण राणेंचा भाजपमध्ये पळ; शिवसेनेचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग : नारायण राणेंची ईडी चौकशी होणार या भीतीने त्यांनी सरळ भाजपमध्ये पळ काढला, त्यामुळे राणेंना संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हणत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर हल्लाबोल आहे. ते सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

गेले 1 वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असं राणे अनेक वेळा म्हणाले होते. मात्र 1 वर्षाच्या कालावधीनंतर हे सरकार अजून भक्कम झालंय. तसेच भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत पुन्हा येत आहेत आणि पोटनिवडणूक लढवण्याची त्यांची मानसिक तयारी झालीय, असं वैभव नाईक म्हणाले.

नारायण राणेंनी गेली 10 वर्षे अनेक आव्हाने आणि भविष्यवाणी केल्या. काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होणार त्यानंतर शिवसेना विसर्जित करणार, अशा वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. या त्यांच्या घोषणांचं पुढे काय झालं हे लोकांना माहीत आहे, त्यामुळे राणेंच्या भविष्यवाणीला आता लोक काडीची किंमत देत नाहीत, असं म्हणत वैभव नाईकांनी राणेंना टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

“नवी मुंबईत भाजपला धक्का! 3 नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश”

“…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू”; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

संजय राऊत नोटीसला घाबरत नाही तर त्यांनी ईडीला हिशोब द्यावा- रामदास आठवले