सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आहेत. एका मंचावर आल्यावर राणेंनी चक्क उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी देवदेवतांना गाऱ्हाणं घातलं.
मुख्यमंत्री सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू करायला आले. मी इथल्या देव देवतांना गाऱ्हाणे घालेन, या सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य दे. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. ईडापिडा असतील तर दूर कर. अशी मी प्रार्थना करतो, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, कालच राणेंनी चिपीचं श्रेय आपलं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राणे आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी राणेंनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी विमानतळाचं श्रेय आपलंच असल्याचंही सांगितलं
महत्वाच्या घडामोडी –
“खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं”
उद्धव ठाकरे, नारायण राणे व्यासपीठावर एकत्र; रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले…
“मी जर रखेल किंवा बाजारू बाई असते तर मी ही लढाई लढले नसते”