ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा भाजपला इशारा, म्हणाले…

0
416

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी ईडीने आज धाड टाकली. तब्बल 5 तास चाललेल्या धाडीनंतर सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

‘सौ सोनार की एक लोहार की, आमच्याकडे मसाला तयार आहे, आम्ही दणका देणार’, असं म्हणत पटोले यांनी भाजपला इशारा दिला. तसंच भाजप जे कटकारस्थान रचत आहे, त्याविरोधात मोहीम आखणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी म्हटलं.

हे ही वाचा : “मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याचा टीझर व्हायरल, बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब काॅपी”

भाजप आणि मोदींविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर ईडीच्या धाडी सुरु आहेत. आम्ही केंद्रीय तसाप यंत्रणांविरोधात रणनिती आखणार. भाजप स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. पण लोकशाहीत जनता मोठी असते, हे भाजपला कळायला हवं. आता जनताच त्यांना धडा शिकवेल, असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी, सभापतीपद भाजपकडे

कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच; UPA अध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटलांचा टोला

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमिताभ-जया-रेखा यांच्या प्रेमाचा त्रिकोण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here