आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
नितीन गडकरी भाजपमध्ये नाराज आहे. तेथील परिस्थिती चांगली नाही. त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे मी आमंत्रण देतो. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. लवकरच नितीन गडकरी यांची भेट घेणार, अशी ऑफर नाना पटोलेंनी यावेळी दिली. यावर आता भाजप नेते संजय कुटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : शिंदे गट- शिवसेनेचा वाद; मनसेची प्रतिक्रिया
काही दिवसांनी नाना पटोलेच भाजपमध्ये येतील, असा दावा संजय कुटे यांनी केला आहे. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नसल्याचं संजय कुटे यांनी यावेळी म्हटलं.
नाना पटोले यांची नितीन गडकरींबद्दल बोलण्याची कुवत नाही. काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपात येतील. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही तो भाग वेगळा. नाना पटोले यांनी यापूर्वीच भाजप दर्शन घेतले आहे. ते सतत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करत असतात. त्यामुळे भविष्यात ते भाजपमध्ये येऊ शकतात. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही, असं संजय कुटे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे सरकारला मोठा धक्का ; ‘या’ कारणांमुळे झाला तब्बल 12 हजार कोटींचा दंड
मनसे-भाजप युतीबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधान, म्हणाले…
“अजित पवार पुन्हा नाराज?; राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित दादांचं पुन्हा नाराजीनाट्य?”