“चित्राताई ठेचतील या भितीनं नागोबा बाहेर आला”

0
247

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. तब्बल 15 दिवसांनी वनमंत्री संजय राठोड यांनी समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

माझी, माझ्या कुटुंबाची तसेच माझ्या समाजाची कृपा करुन बदनामी करु नये अशी विनंती संजय राठोड यांनी यावेळी केली. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देत संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

बिळातला नाग बाहेर आला, त्या नागोबाला माहित होतं आपण जर बाहेर आलो नाही तर चित्राताई त्याला ठेचून काढतील. या भितीने नागोबा बाहेर आला आहे, असं म्हणत प्रसाद लाड यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”

“जयंतरावांचं अचूक नियोजन, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच”

संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here