आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रत्नागिरी : ऑडिओ क्लिपमुळं चर्चेत आलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले.
हे ही वाचा : “छत्रपती शिवाजी महाराज देशाचे दैवत, त्यांचा अवमान तर दूरच, अनादरही खपवून घेतला जाणार नाही”
अनिल परब हे राष्ट्रवादीचे संजय कदम आणि मनसेच्या वैभव खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत. या दोन नेत्यांना सोबत घेऊन अनिल परब शिवसेनेला संपवत आहेत, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. यावरून आता मनसे नेते वैभव खेडेकर यांनी कदमांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून केले आहेत. माझे महात्मा गांधी केवळ आणि केवळ राज ठाकरे आहेत., असं खेडेकर यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, किरीट सोमय्या यांना हाताशी धरून मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम रामदास कदम यांनी केलं. मातोश्री किंवा शिवसेनेचा आदेशही कदम पाळत नाहीत. ही तर त्यांची कदम सेना आहे, असा टोलाही खेडेकर यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन, अमित शहांच्या मुक्कामासाठी स्वत:चा कोट दिला”
भाजप सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का?; छगन भुजभळांचा सवाल
ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या ‘ही निवडणूक काळी निवडणूक’