“मुंबई हादरली; वांद्रयात चार मजली इमारत कोसळली, 15 जण जखमी”

0
235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईतील वांद्र्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

संबंधित घटना ही आज संध्याकाळी 4 वाजणेच्या सुमारास घडल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच 6 रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. या घटनेत 5-6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जण जखमी झाले असल्याचंही समोर येत आहे.

हे ही वाचा : धनंजय मुंडेंसमोरच आमदार चढले झाडावर; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

दरम्यान, संबंधित घटना ही वांद्र्याच्या बेहरामपाडा परिसरात घडली आहे. तसेच जी इमारत कोसळली ती इमारत बेकायदेशीर होती. या इमारतीला मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती, अशी माहितीही आता समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या; चंद्रकांत पाटलांचा टोलो

“मुंबई महापालिका निवडणूकीत मनसे-भाजप युती नाही; भाजप स्वबळावर लढणार”

“भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग-हेझल कीच झाले आई-बाबा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here