Home महाराष्ट्र मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दरेकर यांच्या नेतृत्वाखालील 21 पैकी 21 जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले होते. 4 हजार 581 मतदारांनी निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला होता. 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. त्यापैकी 17 जणांनी बिनविरोध झाली होती.

हे ही वाचा : …म्हणून मी अनिल देशमुखांचे आभार मानतो; नितीन गडकरींनी उधळली स्तुतीसुमने

दरम्यान, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतरही चार जागांसाठी मतदान झाले. त्या जागाही सहकार पॅनलच्या पदरात पडल्याने बँकेवर सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“विधान परिषदेचे भाजपचे आमदार आर.एन.सिंह यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन”

राष्ट्रवादीची भाजपच्या ‘या’ आमदाराला डायरेक्ट ऑफर?; चर्चांणा उधान

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; भाऊ धनंजय मुंडेंनी केला पंकजाताईंना मेसेज