Home महाराष्ट्र मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकरांना झटका?; मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व

मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकरांना झटका?; मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई बँकेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मोठा धक्का बसलाय. मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी दरेकर यांना अध्यक्षपदावरुन बाजूला केलं आहे.

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप आणि दरेकरांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. या घडामोडीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची मोठी खेळी असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा : मराठी पाट्यांचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या मनसैनिकांचं आहे- राज ठाकरे

निवडणुकीपूर्वी आज सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

दरम्यान, दोन्ही पक्षातील नेत्यांनी मिळून मुंबई बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनिती आखली. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवार जाहीर करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी – 

“विदर्भात मनसेला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह मनसेचे 40 पदाधिकारी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार”

संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं; देवेंद्र फडणवीसांचा टोला

“कोरोनावर मात केल्यानंतर रोहित पवार पोहचले कर्जत नगर पंचायत निवडणूकीच्या मैदानात”