मुंबई आणि महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कंगणावर हल्लाबोल

0
154

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणाैतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिर अशी केली होती. तसेच अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे. कारण देशाचा एक भाग पाकव्याप्त काश्मीर होत असेल तर ते पंतप्रधानांचे अपयश आहे. भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते, त्यांना म्हणावं, अनधिकृत सोडून द्या., असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, घरी खायला मिळत नाही आणि मुंबईत यायचं. आणि वर दाखवायचं आम्ही कष्ट केलेत. मुंबई आणि महाराष्ट्रचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, महाराष्ट्राची बदनामी कशाला करायची?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कंगणा रणाैतला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल- निलेश राणे

“उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पाॅझिटिव्ह”

तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो; निलेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

बेन स्टोक्स-संजू सॅमसनची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा मुंबईवर एकतर्फी विजय

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here