“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्यात यावं”

0
227

मुंबई : सध्या चालू असलेल्या लोकसभेच्या सत्रात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी भर लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

मस्यपालनासाठी वेगळं स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात यावं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. पण पड्डूचेरी आणि कोचीला गेल्यावर काही दिवसातच त्यांना असा विभाग कार्यरत असल्याचा विसर पडला आहे, असं गिरीराज सिंग म्हणाले. राहुल गांधींच्या ज्ञानात भर पडावी म्हणून त्यांना शाळेत पाठवण्याची गरज असल्याचा टोलाही गिरीराज सिंग यांनी यावेळी लगवला.

दरम्यान, आमचं सरकार आल्यावर आम्ही स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू, असं राहुल गांधी म्हणाले होते. यावरून राहुल गांधी यांच्या स्मरण शक्तीला काय झालंय माहित नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे मी दुखावलो गेलोय, असा उपरोधक टाेला गिरीराज सिंग यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“नाशिकमध्ये उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 पूर्णपणे बंद”

मराठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केलेला ‘हा’ अप्रतिम डान्स, व्हिडीओ होतोय वायरल; पहा व्हिडीओ

अमृताताई,आपण जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो अशीच आवड जोपासा- रोहित पवार

तपासाला सहकार्य करणाऱ्या एकनाथ खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here