आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर भाजपनं शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडूनही भाजपला प्रत्युत्तर दिलं जातंय. अशातचं शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या फोटोचा संदर्भ देत भाजपाला प्रश्न विचारले आहेत.
जनाब देवेंद्र फडणवीस जी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला आणि झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, 105 आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,असं म्हणत मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार?; राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना- मनसेचा वाद
दरम्यान, मनीषा कायंदे यांनी एका कोनशिलेचा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या यांच्या नावापुढं जनाब लिहिण्यात आलंय. तर, पूनम महाजन यांच्या नावापुढं मोहतरमा लिहिण्यात आलं आहे.
जनाब @Dev_Fadnavis जी, तेव्हा तुम्ही #जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, 105 आमदार निवडूनही @BJP4Maharashtra सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?@ShivsenaComms #BJP pic.twitter.com/tn0j6rWZwp
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) March 20, 2022
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल- करूणा शर्मा