Home महाराष्ट्र “शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या थाटात साजरी”

“शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या थाटात साजरी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय. सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

मुंबईतल्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा अवघा परिसर आज सकाळपासून भगवामय झाला होता. निमित्त होतं, तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचं. ‘मराठी संस्कृतीचं माहेरघर’ म्हणून ओळखलं जाणारं दादर भगवे झेंडे आणि भगव्या पट्ट्यांनी सजलं होतं. मुंबईच्या विविध भागांतून भगवे फेटे बांधून नववारी साड्या नेसलेल्या अनेक रणरागिणी बाईक चालवत आल्या होत्या. पक्षाचे असंख्य पदाधिकारीही भगवे फेटे बांधून आले होते.

हे ही वाचा : जनाब देवेंद्र फडणवीस जी, चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला आणि झुकला नाही का?; शिवसेनेचा सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तसंच महाराष्ट्र सैनिकांना मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी शिवरायांच्या साक्षीने शपथ दिली. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल- ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार यांमुळे वातावरण शिवमय झालं होतं.

याप्रसंगी सौ. शर्मिलावहिनी राजसाहेब ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई, श्री. शिरीष सावंत, सरचिटणीस सौ. शालिनी ठाकरे, सौ. रिटा गुप्ता, श्री. संदीप देशपांडे तसंच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री. अमेय खोपकर आणि पक्षाचे उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार?; राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना- मनसेचा वाद

“ठाकरे सरकार फक्त म्हणण्यापुरतं, मात्र प्रत्यक्षात लाभ मात्र पवारांना…”; शिवसेना खासदारांचं मोठं वक्तव्य

“तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरेंचा मेगा प्लॅन, शिवतीर्थवर जल्लोषात साजरी होणार शिवजयंती”