Home महाराष्ट्र MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारची घोषणा

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारची घोषणा

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. यावर अखेर राज्य सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

येत्या 11 तारखेला महाराष्ट्रात 200 जागांसाठी एमपीएससी परीक्षा जाहीर झाली होती. आज आमची बैठक झाली. गेल्या चार महिन्यात कोरोनाचं संकट आहे. गेल्या काही महिने अभ्यासिका, क्लासेस बंद होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आल्या, अभ्यासाला वेळ मिळायला हवा. त्यामुळे ही परीक्षा काही काळ पुढे ढकलत आहोत, यापूर्वी दोनवेळा परीक्षा पुढे ढकलली होती., असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता पुढे जी तारीख ठरवू त्याच तारखेला काहीही करून परीक्षा होईल. जे 11 तारखेच्या परीक्षेला पात्र होते, ते सर्व पुढच्या तारखेला म्हणजे जी तारीख जाहीर होईल, त्या तारखेसाठी पात्र असतील, कोणाचंही वय वाया जाणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार?- विजय वडेट्टीवार

दिल्ली कॅपिटल्सचे राजस्थान राॅयल्सपुढे 185 धावांचे लक्ष्य

 “महाविकास आघाडी सरकारच्या तीन विकेट निश्चित, पहिली विकेट आव्हाडांची पडणार”

नुसतं बोलण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- छत्रपती संभाजीराजे