कोल्हापूर : कोरोनाचा फटका नोकरी आणि शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या भारतीय नागरिकांना सहन करावा लागत आहे. यातच नोकरीसाठी व्हिएतनाम येथे जहाजावर अडकलेल्या भारतीय तरुणाने तेथील परिस्थिती शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी सुनावली व या संकटात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कोरोनाच्या या संकटात खासदार धैर्यशील माने देवदूतांच्या रूपाने मदतीसाठी धाऊन गेले आहेत. व्हिएतनाम येथे जहाजावर अडकलेल्या कोल्हापुरातील रहिवाशी दर्शन जोशी कार्गो जहाजावर आपल्या विदेशी सहकारी यांच्या सोबत अडकले होते. खासदार माने यांना ही बातमी समजली. बातमी समजताच खासदार मानेंनी सूत्र हलवली.
दरम्यान, खासदार माने यांनी दर्शन जोशी यांच्याशी चर्चा करून धीर दिला व तुझी लवकरच व्यवस्था करतो असं आश्वासन दिले. खासदारांच्या सतर्कतेनंतर तपासणी करून म्यानमार राजकीय दूतावास मध्ये त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. या घटनेनंतर दर्शन जोशी यांनी खासदार धैर्यशील माने व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
महत्वाच्या घडामोडी-
“पडळकरांचं जेवढं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम”- रोहित पवार
“शरद पवारांवरील विधानानंतर पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल”
‘ही’ भाजपची परंपरा नाही; पडळकरांनी केलेल्या टीकेवर भातखळकरांच वक्तव्य
‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी; ठाकरे सरकारची भक्कम तयारी