अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण

0
158

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत घरातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आता नवनीत राणा यांचाही कोरोना रिपार्ट पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केलं आहे.

माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते.मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा ,शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे नवनीत राणा यांनी फेसबुवर याबाबतची माहिती दिली.

https://www.facebook.com/navneetkaurranaofficial/posts/2102676766544031

महत्वाच्या घडामोडी-

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन कंगणा राणावतचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ 7 प्रश्न

वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळले; जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान

मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गेल्या 500 वर्षापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो, आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे- एकनाथ खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here