आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. काल 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
ईद (3 मे) नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून बिना परवानगीचे भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण झालेच पाहिजे, अशी राज यांनी या सभेत घोषणा केली. तसेच राज यांनी यावेळी, शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावरून आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी अल्टिमेटम मुस्लीम समाजाला नाही, तर राज्य सरकारला दिलंय. त्यामुळे हा संपूर्ण मुद्दा राज्य सरकार कसा हाताळते हे पाहणं महत्वाचं आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं आहे, त्यामुळे ते ही परिस्थिती कशी हाताळते, काय निर्णय घेतात हे पाहू., असं जलील म्हणाले.
हे ही वाचा : “जसं शेन वाॅर्नला स्वप्नात सचिन तेंडूलकर दिसायचा, तसं राज यांना शरद पवार दिसतात”
जर ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ ते अयोध्येला निघून जातील आणि नंतर कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावावी, काही झाल्यास कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून घ्यावेत, राज मात्र अयोध्येला जातील. बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याऐवजी त्यांना भरकटवण्याचं काम राज ठाकरे करत आहेत, अशी टीका जलील यांनी यावेळी केली.
दरम्यान, “तुम्ही भाजपाच्या इशाऱ्यावर हे सगळं करत आहात, मग त्यांची देखील यापूर्वी 5 वर्ष राज्यात सत्ता होती. त्यांनी त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन का केलं नाही. राज्यात सगळं सुरळीत चाललंय, कोरोनातून आपण वाचलो आहोत, वर्षापूर्वी आपण औषधांसाठी भांडत होतो आणि आता आपण रोजगार, महागाई, आरोग्य सुविधा हे सर्व सोडून भोंग्यांवर बोलत आहात. इतिहास आता पुन्हा उकरून काढण्यात काही अर्थ नाही, असंही जलील यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“राजकीय घडामोडींना वेग, ‘या’ निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी”
3 मे नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर…; औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंची मोठी घोषणा
कुणी कितीही भगव्या शाली पांघरल्या, तरी…; संजय राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला