मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण संभाजी छत्रपतींना मोदींनी भेट दिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दौरे सुरू झाल्यापासून भाजप आणि त्यांच्यातील अंतरही वाढू लागलं असून भाजपच्या नेत्यांनी तर त्यांच्यावर टीकाही केली आहे.
संभाजी छत्रपती यांनी या दौऱ्याच्या माध्यमातून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर, सोशल मीडियातून संभाजी छत्रपती यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करावा, अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे संभाजीराजे नवा राजकीय पक्ष स्थापन करणार का? या चर्चेने जोर धरला आहे.
दरम्यान, संभाजीराजेंनी नवा राजकीय पक्ष काढावा म्हणून आता सोशल मीडियातून चळवळ सुरू झाली आहे. ‘मराठा समाजातील तरुणांचे एकच लक्ष्य, छत्रपती संभाजीराजेंनी काढावा नवीन राजकीय पक्ष’, अशा आशयाचा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल केला जात आहे. अनेक तरुणांनी आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेट्सवर हा मजकूर ठेवला आहे. त्यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांतदादांना स्वप्नं बघण्याचा छंद; जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला
पेट्रोलने शंभरी गाठली! दाढीवाला फलंदाज आणि मॅन ऑफ दि मॅच; ठाण्यात राष्ट्रवादीची होर्डिंगबाजी
पंतप्रधान मोदींमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?- जयंत पाटील
राज्यात 15 दिवस लाॅकडाऊन वाढणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे