आईचा चिमुकलीला दम; मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन, म्हणाले… आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता?

0
244

पुणे :  पुण्यातील एका चिमुकलीला तिची आई अंतर पाळण्याचं उद्धव काकांचं ऐकणार की नाही? , असं विचारतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देखील पोहचला आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः या चिमुकलीच्या वडिलांना फोन करत आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता असा प्रेमळ जाब विचारला. उद्धव ठाकरेंनी विचारणा केल्याने या कुटुंबाला सुखद धक्का बसला.

पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये विश्रांत सोसायटी येथे शिंदे कुटुंबात अंशिका नावाची त्यांची 3 वर्षाची मुलगी आहे. तिची आई तिने या काळात स्वच्छता आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सांगत आहे. यावर ही चिमुकली आपल्या आईला पुन्हा नियम मोडणार नाही, पण उद्धव काकांना माझी तक्रार करु नको, अशी विनंती करताना दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच- अतुल भातखळकर

उद्धव ठाकरे लोकप्रिय वाटत असतील तर ते चांगलंच आहे, पण… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

“रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया”

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं जातंय; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here