मुंबई : मला या माणसाचं आश्चर्य वाटतं, हा कृषी मंत्री होता. इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, थोडी जरी शेतकऱ्यांबद्दल चाड असती, शेतकऱ्यांची व्यथांची.. काय गोष्टी करतोय हा माणूस, असं म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोडें यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले. लाज वाटली पाहिजे, यांना सत्तेचा माज आलाय… यांचा माज बाहेर येतोय.. देशाचा अन्नदाता बसलाय दिल्लीत.. ते काही काँग्रेसवाले आहेत का…? असं म्हणत भाई जगताप यांनी अनिल बोडें यांच्यावर निशाणा साधला आहे.
इतकं अंधाधूंद माजलेले आहेत तुमचा माज शेतकरी आणि कामगार उतरवेल. यांनी हे केले त्यांनी ते केलं असं सांगता, तुम्ही काय केलं हे सांगा, असं म्हणत भाऊ जगताप यांनी बोडें यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचं काम काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षानं केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला होता.
महत्वाच्या घडामोडी-
“आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा”
शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण
“BREAKING NEWS! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील काही भागातील इंटरनेट सेवा बंद”
दिल्लीतील आंदोलनात शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू