केरळचा युवा यष्टीरक्षक मोहम्मद अझरुद्दीन मागील काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे. सध्या अझरुद्दीन पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्याचा एका स्थानिक स्पर्धेतील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
केरळ येथे सध्या प्रेसिडेंट टी२० चषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत केसीए ईगल्स विरुद्ध केसीए टस्कर्स विरुद्धच्या सामन्यात अझरुद्दीनने केलेल्या एका अफलातून धावबादचा व्हिडिओ पुढे आला आहे, त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
टस्कर्सच्या फलंदाजाने कव्हर्समध्ये मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक रॉबिन कृष्णनने यष्टीरक्षक अझरुद्दीनकडे फेकला. चेंडू यष्ट्यांपासून दूर जात असलेला पाहून अझरुद्दीनने चित्त्याच्या चपळाईने हवेत सूर मारत चेंडू पकडला व श्रीनाथ के या फलंदाजाला धावबाद केले.
RCB’s azharudeen wicket keeping skills
He also scored 69(43) at 160 strike rate. #KeralaT20 #RCB #IPL2021 pic.twitter.com/WoVnZdU6gm
— as|am (@asIam_as) March 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत-इंग्लंड टी-20 मालिका रद्द करा अन्यथा आत्मदहन करेन”
“भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन”
जोस बटलरच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडचा मोठा विजय; मालिकेत 2-1 ने आघाडी
…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार; निलेश राणेंचा इशारा