नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्यात गुप्त भेट झाल्याचं वृत्त समोर येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच गडकरी पवारांना भेटल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत येऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच 2 दिवसांपूर्वी शरद पवार आणि नितीन गडकरी यांची गुप्त भेट झाल्याचं वृत्त आहे. शरद पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली. तसेच मोदींच्या सांगण्यावरून ही भेट झाल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान, नितीन गडकरी हे मोदींचा कोणता निरोप घेऊन शरद पवारांना भेटले याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही.
महत्वाच्या घडामोडी –
…अन्यथा मनसे स्टाईलने रेल भरो आंदोलन करावं लागेल; मनसेचा राज्य सरकारला इशारा
कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…
पंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”