Home महाराष्ट्र “सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत”

“सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत”

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून विरोध केला जात आहे . या कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा तसेच इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आदोलंन केलं आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही या सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधलाय.

दमबाजी कुणाला करताय? देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करुन नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले आहे. ते तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी, असं ट्विट अतुल भातखळकरांनी मेधा पाटकर यांना उद्देशून केलं आहे.

दरम्यान, मेधा पाटकर यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत “कृषी कायद्यांवर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लगेल,” अशी मागणी केली होती.

महत्वाच्या घडामोडी-

मतदारांनी भाजपला जागा दाखवली; कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित- सचिन सावंत

“देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”

स्थगिती उठविली न जाणं ही सरकारची एक प्रकारे नाचक्की- चंद्रकांत पाटील

“आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री WI-FI; ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी”