सोलापूर : आजच्या काँग्रेस ही उत्तर प्रदेशातील हवेली मोडकळीस आलेल्या जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसशी जवळीक साधत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशातील सध्याचे राज्यकर्ते स्वत:ला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या त्यांनी अमेरिका आणि युरोपधार्जिण्या, तसेच देशातील हातावर मोजण्या इतक्या लोकांना मोठे करण्याचा उद्योग करत आहेत. यातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूला तिलांजली देण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. ते सोलापूर जिल्ह्यातील वाटेगाव येथील कार्यक्रमात बोलत होते.
देशातील गरीब सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेऊन पंडित नेहरूंनी देश उभा केला. मात्र आज देशातील सार्वजनिक मालमत्ता विकून खासगीकरणाकडे मोदी सरकारने वाटचाल सुरू केली आहे. देशातील चार-पाच लोकांना या मालमत्ता विकून देश चालवता येईल, अशी त्यांची मानसिकता आहे, अशी टीका जयंत पाटलांनी यावेळी केली.
दरम्यान, खरं तर काॅंग्रेसच्या काळातील कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची आठवण देशात राहू न देण्याची मोदी सरकारची मानसिकता झाली आहे, असा घणाघात जयंत पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला
साकीनाका बलात्कार प्रकरण! पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही
रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात FIR दाखल करणार- हसन मुश्रीफ