मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. आता यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गायकवाड आयोग कोणी नेमला?-फडणवीस
कायदा कोणी केला?-फडणवीस
उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील कोणी नेमले? – फडणवीस
102 वी घटनादुरुस्ती कोणी केली? मोदीजी
राज्यांचे आरक्षण देण्याचे अधिकार कोणी संपुष्टात आणले? मोदीजी
मोदी,फडणवीसांचे #मराठाआरक्षण रद्द होण्याचे पाप मविआ सरकारच्या माथी कसे?, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
आता मोदी सरकारने 102 व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार संपुष्टात येत नाही हे संसदेला सांगितले पण सर्वोच्च न्यायालयात टाळाटाळ का केली? इच्छा नव्हती का? आता हे पाप मोदी सरकारने निस्तरावे. आरक्षणाची शिफारस राज्य सरकार करेल. कमिशन नेमून राष्ट्रपतींकडून मोदींनी शिक्कामोर्तब करावे., असंही सचिन सावंतांनी म्हणलं.
आता मोदी सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार संपुष्टात येत नाही हे संसदेला सांगितले पण सर्वोच्च न्यायालयात टाळाटाळ का केली? इच्छा नव्हती का? आता हे पाप मोदी सरकारने निस्तरावे. आरक्षणाची शिफारस राज्य सरकार करेल. कमिशन नेमून राष्ट्रपतींकडून मोदींनी शिक्कामोर्तब करावे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षण नाकारले जाणे हे पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारचे अपयश- चंद्रकांत पाटील
“राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”
“मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये याची पुरेपूर काळजी ठाकरे सरकारने घेतली”
…म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणचा मुडदा पाडला; फडणवीसांचा गंभीर आरोप