मनसेची अनोखी बॅनरबाजी; शिवसेनेचं अभिनंदन करणारा उलटा बॅनर लावला

0
447

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील  यांनी शिवसेनेचे अभिनंदन करणारा उलटा बॅनर ट्विट केला आहे. हे ट्वीट करुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर खोचक टिका केली आहे. या उलट्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणारच; देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात निर्धार

डोंबिवलीतील निवासी भागातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 36 कोटी रुपये मंजूर केले असल्याचा बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आला होता. काम प्रत्यक्षात सुरु झाले नसल्याने मनसेकडून त्यावर टिका करणारी बॅनरबाजी करण्यात आली होती. काम सुरु करा असा आग्रह मनसेने धरला होता.

दरम्यान, 17 फेब्रुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ झाला होता. यावेळी व्यासपीठावर मनसे आमदारही उपस्थीत होते.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपला राज्यात पुन्हा येऊन देणार नाही; शरद पवारांनी फोडली डरकाळी

“राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; मंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांचा पदभार दुसऱ्या मंत्र्यांना देणार”

गोव्याच्या जनतेनं शिवसेना, राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखविली; नितीन गडकरींची टोलेबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here