“सोलापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, मनसेच्या रेश्मा सुरेश टेळे नगरसेवकपदी विराजमान”

0
934

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पहायला मिळत आहे.

मनसेनं सोलापूर जिल्ह्यात आपल्या विजयाचं खातं उघडलं आहे. माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांची पत्नी रेश्मा सुरेश टेळे या नगरसेवक पदी विजयी झाल्या आहेत.

हे ही वाचा : “आबांच्या मुलानं नगरपंचायत गाजवली, कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांचा दणदणीत विजय”

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी मनसेत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

नंदूरबारमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, 17 पैकी 13 जागांवर बाजी मारत नगरपंचायतीवर झेंडा फडकवला

कर्जतमध्ये रोहित पवारांनी मारली बाजी; भाजपचा पराभव करत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

“अहमदनगरमध्ये मनसेनं खातं उघडलं, शिरसाठीवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा झेंडा फडकला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here