मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेना महिला नेत्याचा मनसेत प्रवेश

0
2643

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच मनसेनं शिवसेनेला मोठा दणका दिला आहे. शिवसेना डोंबिवली युवती शहर अधिकारी प्राजक्ता देशपांडे यांच्यासह असंख्य डोंबिवलीकरांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडी फुट; जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे, तर शिवसेनेला ठेंगा

राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित त्यांनी होऊन आमदार राजु पाटील यांच्या हस्ते शिवसेना डोंबिवली युवती शहर अधिकारी प्राजक्ता देशपांडे यांच्यासह यशा जमदाडे,विनिता शेरेकर, उर्जिता माधव, आकाश भानुशाली, नवेश राजु, नेहा धारप, समिप कांबळे,नागेश जोशी, अनिरुद्ध म्हात्रे, विवेक खांडेकर, स्वप्निल शिंदे, महेश धनावडे, महेश आचरेकर, हरीश भट आदींनी मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, शहरअध्यक्ष मनोज घरत,हर्षद पाटील,सुदेश चुडनाईक,दिपीका पेडणेकर,मंदा ताई पाटील,कोमल पाटील उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का; ‘या’ माजी नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश

“निवडणूक व्हायच्या आधी काहींनी सांगितलं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण आम्ही त्यांना येऊ दिलं नाही”

“चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here