आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला मनसेनं पाठिंबा दर्शविला आहे.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्रक मनसेने जारी केले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रक काढून मनसैनिकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. मनसेच्या सहभागामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमात भाजप आमदारांची हजेरी; चर्चांना उधाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे सहभागी होत आहे.
एसटी कर्मचारी कामगार जगला, तरच एसटी जगेल’ हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करण्यात येते की, राजसाहेबांच्या आदेशानुसार आपणा सर्वांना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे, असं परिपत्रक जारी करून नांदगावकर यांनी मनसैनिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
#मनसे_एसटी_कामगारांसोबत#MNSWithSTWorkers pic.twitter.com/1e0a7mlBRy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार?; उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक”
भाजपा आमदार आणि राष्ट्रवादी नेत्यांची बंद दाराआड चर्चा; चर्चेला उधाण