मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. राज ठाकरेंना 5 जानेवारील कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता ॲमेझाॅन आणि मनसे वाद चांगलाच चिघळला आहे. यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेेत.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडण्यात आलं आहे. पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केलं आहे.
अमेझॉन चं दुसरं कार्यालय फुटलं. गेली 14 वर्ष आम्ही माय मराठीसाठी लढतोय हे अमेझॉन ला समजून सांगितले होते, पण शेवटी मनसेला नाइलाजाने खळ्ळ् फट्याक् करावाच लागला!, असं मनसेच्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“BREAKING NEWS! अभिनेता रजनीकांत रूग्णालयात दाखल”
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; सिराज-गिल यांचं पदार्पण
नाईट कर्फ्युवरून केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…
“जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”