आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला असून युवा कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा सपाटा मनसेने सुरू केला आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. नवी मुंबईच्या नेरूळ येथील अनेक युवा शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : “काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं भाजप नेत्याशी बंद दाराआड केली चर्चा; राजकीय चर्चांना उधाण”
आज सकाळी हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नेरळ शहरातील तरुण शिवसैनिकांनी पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, या प्रसंगी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष मिलिंद मिसाळ, जयवंत कराळे, किरण राऊत, स्वप्नील शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीविरोधात भाजपाची मोठी रणनीती; मंगळवारी होणार महत्त्वाची बैठक
“स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं आहे, मी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन करतो”
“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; नवी मुंबईतील अनेक तरूणांनी मनसेचा झेंडा हाती धरला”