आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रीय तपास एजन्सीनं पुण्यासह देशभरात पाॅप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन केलं. यावेळी पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाह हूं अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून या प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
पाकिस्तान जिंदाबाद या घोषणेचा निषेध करण्यासाठी पुण्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. तसेच या कार्यकर्त्यांनी यावेळी वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद, अशी घोषणाबाजी करत पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतचं ट्विट केलं आहे.
हिंदुस्थान जिंदाबाद !
‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा आमच्या पुण्यात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देशद्रोह्यांविरोधात पुण्यात तीव्र निदर्शनं ! pic.twitter.com/l3mrs2zC02
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 25, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून मारा- आशिष शेलार
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश