मराठी भाषावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व पक्षांना खडसावलं, म्हणाले…

0
636

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात एका दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना, त्यांनी मराठी भाषा दिवस 365 दिवस साजरा व्हायला हवा, अशी भूमिका यावेळी मांडली.

जगामधील कोणीही महाराष्ट्रात फोन करु देत त्याच्या कानी मराठीचा आवाज पडला पाहिजे नंतर बाकीच्या भाषा पडतील. तसेच आपण आपल्या भाषेबद्दल आग्रही असलं पाहिजे. देश आपला आहे हे मान्य आहे, ऐकोपा असला पाहिजे हे मान्य आहे. पण देशानं देखील आम्हांला मानलं पाहिजे. आपल्या भाषेवर आपण ठाम राहणं आवश्यक आहे. काही जण इंग्रजी भाषेतून मुलं शिकतात, असं म्हणतात. कोणत्या भाषेत शिकता म्हणता ते महत्त्वाचं नाही, भाषेबद्दल प्रेम असणं, अभिमान असणं महत्त्वाचं आहे. भाषेसाठी भूमिका घेता का हे महत्त्वाचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य कसं असेल?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

आपल्याकडे ज्यावेळेला मोबाईल फोन आले त्यावेळेला इंग्रजी आणि हिंदी भाषा होत्या. त्यावेळेला एअरटेल आणि इतर कंपन्या होत्या, त्यावेळेला त्या कंपन्यांनी मराठी करणार नाही असं सांगितलं. त्या एअरटेलची खेचली, खळ खळ आवाज त्या कंपन्यांना ऐकू आले. त्या कंपन्यांनी काही दिवस लागतील असं सांगितलं. मात्र, आम्ही त्यांना इतके दिवस दिले होते, काही केलं नाही, आजच्या आज हे ऐकू यायला हवं हे सांगितलं. त्यानंतर मराठी आवाज ऐकू यायला लागला, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, मराठी भाषेचं प्रेम हे वाचूनचं येईल, हे काम साहित्यिक, कवी यांनी मराठी भाषेबद्दल संस्कार केले पाहिजेत. महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून अपेक्षा नाहीत, साहित्यिकांनी भाषा टिकवावी, गोडी लावावी, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here