आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत.
हे ही वाचा : “राज्य सरकारचा मोठा निर्णय; अखेर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन”
राज ठाकरे सर्वप्रथम येत्या 14 डिसेंबर रोजी सर्वप्रथम मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत., अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“अखेर ठरलं! जळगाव जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडं, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडं”
“राष्ट्रवादीचा मनसेला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”
“कर्नाटकमध्ये 2 ओम्रिकाॅन विषाणूचे रूग्ण सापडले; रूग्णाच्या संपर्कातील 5 जण पाॅझिटिव्ह”