नागपूर : वीजबिल माफीचा सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिला असून या आंदोलनाची पहिली सुरूवात विदर्भातून होणार आहे.
दि.24 नोव्हेंबर मंगळवार रोजी मनसेकडून वाढीव वीजबिलाविरोधात विदर्भातील हिंगणघाट शहरात आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचा निषेधही नोंदवण्यात येणार असल्याचंही मनसेनं म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; रूग्णालयातून दिला डिस्चार्ज
“शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरली तर 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”
“भाजप हा हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे”
“महाराष्ट्राच्या हास्यजत्रेसाठी अभिनेत्री पूजा सावंतचा नवीन खास लूक”