आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरही भाष्य केलं.
मशिदीवरील भोंग्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा लावण्याच्या आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिक व कार्यकर्त्यांना दिला. यावरून पुणे मनसेत अंतर्गत वाद निर्माण झाला असून पुणे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अशातच पक्षातील नाराजी कमी करण्यासाठी वसंत मोरे यांना स्वत: राज ठाकरेंनीच बोलावणं पाठवलं आहे.
हे ही वाचा : “पुढचे 25 वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच दिसतील; ‘या’ नेत्याचा दावा”
राज यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या आदेशाबाबत नाराज असलेले वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांनी वसंत मोरेंना भेटीसाठी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी बोलावलं आहे. वसंत मोरे हे शुक्रवारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.
दरम्यान, यामुळे राज ठाकरे हे आपल्या वसंत मोरे यांची नाराजी कशी दूर करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“पुढचे 25 वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच दिसतील; ‘या’ नेत्याचा दावा”
“शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”