मनसे-भाजप महायुती होणार की नाही? गुलाबराव पाटील, म्हणाले…

0
595

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या दीपोत्सवात मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यावर आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीसुद्धा या युतीवर भाष्य केले आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांची पोलिसात तक्रार, म्हणाले, राणा यांनी…

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे, स्वाभाविक आहे.  हे तीनही नेते पहिल्यांदा एकत्र आलेले नाहीत. याआधीही त्यांच्या भेटी झाल्या आहेत. तसेच युती होणार की नाही हे लवकरच कळेल. दिवाळीनंतर स्पष्ट होईलच, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांना मंचावर एकत्र बघून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 माझ्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही, पण आज…; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

टीम इंडियाच्या दमदार ‘विराट’ विजयावर, पत्नी अनुष्का शर्माची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली…

हरलेली मॅच पाकिस्तानच्या खिशातून विराटने खेचून आणली; वेलडन विराट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here