आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला जळगावात मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात प्रवेश केला आहे.
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या प्रयत्नांनी शेकडो कार्यकर्त्यांनी आज मनसेत प्रवेश केला.
ही बातमी पण वाचा : शिंदे-फडणवीसांना मोठा धक्का? ‘या’ मोठ्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट
मनसे गाव-खेड्यापर्यंत पुन्हा एकदा जास्त घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे मनसे पक्षात कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, मनसेतला हा पक्षप्रवेश जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज ठाकरें घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय; वाचा सविस्तर
राम मंदिरावरून शरद पवार यांची भाजपवर टीका; म्हणाले…