आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. अशातच शिंदे गटातील बच्चू कडू यांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे.
मंत्रीपद आमचा हक्क; तो आम्ही मिळवणारच’, अशी गर्जना बच्चू कडूंनी यावेळी केली. तसेच अपक्ष शिवाय राहू शकत नाही, कारण मोठी संख्या यामध्ये आहे त्याचा विचार व्हावा, असंही बच्चू कडू म्हणाले.
हे ही वाचा : “बंडखोरीचा सेनेला फायदा; राज्यभर नेटवर्क असलेल्या ‘या’ डॅशिंग युवा नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
दरम्यान, आता शिंदे साहेबांनी, केंद्राने आम्हांला शब्द दिला, येणारा जेंव्हा विस्तार होईल त्यांनी सर्व सांगितलं तर हा आमचा शब्द आहे, सध्या काही गोष्टी प्रत्येकाला सांभाळावं लागतं आणि ते आम्ही पण सांभाळलं पाहिजे तेंव्हा एकत्र जेंव्हा बसलो आपण, तेव्हा काही मागं घेणे काही या गोष्टी राजकारणात केल्याशिवाय राजकारण मजबूत होत नाही. आम्हाला माहित आहे त्यांना त्यांच्या शब्दाला आम्ही पुन्हा ठाम राहतोय मुख्यमंत्री यांनी अपक्षांना जो शब्द दिला आहे ते त्या शब्दावर ठाम राहतील, असा विश्वास बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आता शिवसेनेकडे?; ‘या’ आमदाराच्या नावाची चर्चा”
“शिवसेनेला पुन्हा खिंडार; नांदेडच्या जिल्हाप्रमुखासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार”
…तर मी देखील राजकारणात नसतो; नाशिक दाैऱ्यात अमित ठाकरेंचं मोठं विधान