आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये मंत्री, आमदार यांनाही कोरोनाचा लागण झाली आहे. यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी”
नव्या वर्षात राज्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवला आहे. मात्र, रोजची रुग्णसंख्या आणि वाढीचा दर लक्षात घेऊन कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील, असं अजित पवारांनी म्हटलं. अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केलं. यावेळी पत्रकारांनी कोरोनाच्या परिस्थितीविषयी विचारणा केली असता, अजित पवारांनी याबाबतचती राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
नव्या वर्षात राज्याला कोरोनामुक्त करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची बैठक झाली. साधारण दररोजचा आकडा लक्षात घेऊन किती पटीत रुग्णांची संख्या वाढतेय, ते बघून त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. पण रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली, तर नाईलाजाने अजून कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ शकते. तशी येऊ नये, म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं, तर आपल्याला त्यातून मार्ग काढणं सोयीचं आहे, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?; काँग्रेस नेत्याचा टोला
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काढली अजित पवारांची अक्कल, म्हणाले…
“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; यवतमाळमधील ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”