आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार व अपक्ष 10 आमदारांसोबत मिळून शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. अशातच आता अनेक आमदारांना मंत्री पदाची ऑफर असल्याने ते शिेंदे गटाकडे गेल्याचं बोललं जात आहे.
सांगली जिल्ह्यातील अनिल बाबर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात बंडखोरी केली. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाबर यांना अप्रत्यक्ष आव्हान दिलं आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांना संधी देण्यात आली आहे. मंत्री, संत्री कोणी पण होऊ देत, सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे आहे. आपण करेक्ट कार्यक्रम करू, असा अप्रत्यक्ष इशारा जयंत पाटलांनी यावेळी अनिल बाबर यांना दिला. जयंत पाटील विटा नगरपालिकेच्या निवडणूकीसंदर्भात आढावा बैठकीत बोलत होते.
हे ही वाचा : तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण…; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनीक आवाहन
दरम्यान, यामुळे आगामी नगरपालिका, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जयंत पाटील आणि अनिल बाबर यांच्यात जोरदार सामना होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य पाहिलतं का; जगलिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
शिवसेनेचे 12 खासदार भाजपच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य
आमदार शंकरराव गडाखांकडून उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचं काैतुक, म्हणाले…