आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मात्र या खातेवाटपात फेरबदल करण्यात आला असून मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आता अब्दुल सत्तार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
ही बातमी पण वाचा : अजित पवारांकडे अर्थखातं दिल्यावर, एकनाथ खडसेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले…
“कृषीमंत्री असताना सर्व मंत्र्यांनी मदत केली. एक वर्ष कृषीमंत्री म्हणून चांगलं काम केलं. एक वर्षात कृषी मध्ये चांगले काम करणारे हे पहिले सरकार आहे. नवे कृषीमंत्री धनंजय मुंडे तरुण आहेत. ते काम करण्यासाठी सक्षम आहेत. धनंजय मुंडे हे कर्तव्यदक्ष शेतकऱ्याचा मुलगा आणि चांगले राजरकारणी आहेत. मराठवाड्या भूमिपुत्र असल्याने धनंजय मुंडे चांगले काम करतील”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल, चर्चांना उधाण”
अखेर वाटप जाहीर; मंत्रिमंडळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रीपद?; वाचा सविस्तर
“देवेंद्र फडणवीस राजकारणात सक्रिय झाल्यापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू झालं”